Powered By Blogger

Thursday, February 24, 2011

शाळा

'शाळा' म्हणजे काय रसायन असतं हे शाळा सोडल्यावरच कळत असेल बहुतेक. ती खाकी चड्डी, तो चुरगाळलेला पांढरा शर्ट, ती पाण्याची व्याटरब्याग, अजून स्कूल बॅग न झालेले साधे सुधे दप्तर,तो अजून लंच बॉक्स न झालेला जेवणाचा डब्बा, ती मधली सुट्टी, ती हिरो जेट सायकल, ते वर्षानुवर्षे करकटकांची कलाकुसर सहन करत आलेले लाकडी बाक, ते एकमेकाना फेकून मारलेले कागदाचे बोळे, तो हवाहवासा वाटणारा मराठीचा तास,ते जीवघेणे बीजगणित आणि भूमिती ,ते नदीकाठचे ग्राऊंड, ते अनवाणी पायांनी तासन तास खेळलेले हाफ पीच क्रिकेट,शेजारी संथपणे वाहणारी कृष्णामाई, नदीपलीकडचे कायम हिरवेगार शेत आणि नारळाच्या बागा, उजवीकडे दिमाखात उभा असलेला आयर्विन पूल, अशा एक ना अनेक आठवणी, कितीक दिवस, कितीक क्षण. ह्या क्षणांचे कधीच मोल होवू शकत नाही.म्हणूनच कदाचित त्यांना 'सोनेरी क्षण' म्हणत असावेत!!!
--चैतन्य

No comments: