Tuesday, May 6, 2014

Confessions of an ITwallah - Heavy Steps

With heavy steps, cloudy eyes and even cloudier heart, I take a final strolls inside company campus, three years doesn't quite sound to be a big number, still when I say 36 months and  multiply it by on an average 10 hours per working day , it does seem to be infinite. When I look back, I always wonder when we try to recollect something, it's only the good people and good memories that we always carry with us or rather we always wish to carry. There is always a session of goodbyes and good wishes that marks your final moments, it's ironical that you willfully decide to leave a place and yet these last minutes keep you pulling inside, pulling towards your scanty cubicle, a company property of course but still you kept calling it your own. This is the day when you wish to capture every moment, you wish if time could pass a little more slowly.

This is a day when I feel, there is an organization, then there is me, there is an id card I keep calling a mangalsutra, there is a company bus, a cubicle, a machine, a laptop, dingy chair that I find is always missing when I come back from wash room, there are projects, there are deadlines, then there is a client, there is a manager, then there is an appraisal, there is a rating and then there are e-mails, there are arguments, there are meetings, coffee breaks, there are colleagues, there are gossips, there are chics around, nerds, geeks and politicos around and then there is me who is nowhere among them, he is there just to register his physical presence and to make ends meet, just because he couldn't do anything else preferred to end up here.

Let's admit that I am not a person with emotional outbursts. Love to have nothing but professional environment around, avoids too much personal level interactions, strictly believe that there are only colleagues at a workplace and no friends. And yet, on this day, I increasingly disprove my baseless perceptions. Whenever one leaves a place, one misses nothing but the people and there are always some special Goodbyes to carry along...

The journey continues.....

Wednesday, January 8, 2014

पाऊस असा रुणझुणता...

पाऊस कधीचा कोसळतो अंतरात
काहूर अनामिक एक, दाटते स्पंदनांत...

'पाऊस' ह्या निसर्गाच्या अविष्कारातच जणू मला एक प्रकारची गूढरम्यता वाटते. परीक्षेत निबंध लेखनासाठी माझा आवडता ऋतू असा विषय असला की पावसाळा सोडून दुसरं काही खरडल्याचं स्मरणात नाही. आधी दादा, आणि नंतर लक्ष्मण, द्रविड, तेंडुलकर असे एक एक रथी महारथी एका पाठोपाठ निवृत्त झाल्यानंतर, मरगळून गेलेल्या भारतीय टीम मध्ये अचानक कुठूनसा विराट कोहली उगवावा (हो, कितीही उध्दट आणि माजोरडा असला तरी एक फलंदाज म्हणून तो आवडतो) आणि त्याने लाजवाब फटक्यांची आतषबाजी चालू करावी अगदी असंच काहीसं होतं जेव्हा ऊन्हाळ्यातल्या आग ओकणार्‍या सूर्याने रापलेल्या, म्लान होऊ घातलेल्या मातीवर टपोर्‍या थेंबांचा शिडकावा होतो आणि अक्षरशः वेड लावणारा मृद्गंध रंध्रारंध्रांत व्यापून जातो, महागडे, इम्पोर्टेड असली बिरुदावली मिरवणारे परफ्युम्स सुध्दा तिथे झक मारतात्. माझी एक फँटसी आहे, घराला मोठी गॅलरी असावी, बाहेर मस्त पाऊस चालू असावा, आणि हातात कॉफीचा वाफाळता मग घेवून खुर्चीत बसून , बशीतली गरम गरम कांदा  भजी खात खात ( पाऊस , कॉफी अन भजी, काय होली ट्रिनीटी आहे ना )तासन तास फक्त बाहेर न्याहाळत बसावं. झाडांच्या फांद्यांवरून, पानापानांवरून ओघळणारा, रस्त्याच्या कडेने नागमोडी वळणे घेत वाहणारा, रिमझिम, मुसळधार, संततधार, भीषण, रौद्र अशा असंख्य रुपांनी बरसणारा पाऊस मनात साठवावा. एरवी येवढ्याश्या आवाजाने त्रासून जाणारा मी , पण खाली गळालेल्या शुष्क पानांवर जलधारा आपटल्यावर जो टप टप चा लयबध्द नाद होतो त्याने मात्र सुखावून जातो. मुळात पावसाची जातकुळी रोमॅन्टीक असावी, म्हणूनच तो कित्येक कवी, लेखक, गीतकारांना इन्स्पायर करतो, प्रियकराला प्रेयसीच्या जास्ती जवळ आणतो, जातीचाच सुंदर गुलाब, पण पाकळ्यांवर पावसाचे एक-दोनच थेंब पडले की एखादी लावण्यवती गालावरच्या तीळामुळे आणखीनच गोड दिसते तसाच टवटवीत होवून जातो. एरवी ओकेबोके वाटणारे डोंगर सुद्धा अगदी ब्युटी पार्लर मध्ये जावून आल्यासारखे दिसायला लागतात. ह्या पावसाला कधी कधी हुलकावणी द्यायची खोड येते, एखाद्या दिवशी असं अचानक अंधारून येतं, काळे कुळकुळीत ढग कुंद आभाळात दाटून येतात, मधूनच एखादी वीज लपंडाव खेळून जाते, सोसाट्याचा बोचरा वारा अंगात शिरशिरी भरतो. पण थोड्याच वेळात सगळं पुन्हा नॉर्मल. एखाद्या फ़ास्ट बॉलर ने जीवाच्या आकांताने धावत येवून सुंदर यॉर्कर टाकावा, फ़लंदाजाचा बूट चाटत त्याला काही कळायच्या आत त्याची दांडी वाकवावी आणि जल्लोष सुरू होतोय तेवढ्यात अगदी चंद्रचूड सिंग पेक्षाही मख्ख चेहऱ्याने अंपायरने नो बॉल चा इशारा करावा, असंच काहीसं होतं.

काही लोकांना पाऊस आवडत नाही. पावसाने रस्ते घसरडे होतात, सगळीकडे चिखल होतो, खड्ड्यांमध्ये पाणी साठते, गटारे तुंबतात, पूर येतात, सगळीकडे घाणेघाण होते, डास होतात, रोगराई पसरते इ. इ. अशा एक ना अनेक तक्रारी करतात. पण मला कधी ह्याचा त्रास वाटला नाही. कुठेतरी पावसाबद्दल एक प्रकारचा आपलेपणा जाणवतो. त्याला काहीतरी सांगायचं असतं, ढगांच्या पोटांत साठून साठून एक दिवस तो अनावर होतो आणि उभा आसमंत  कवेत घेत घेत सहस्त्र धारांनी बरसत मनं आणि शरीरं दोन्ही चिंब इ करत सुटतो. माझं सुध्दा असंच होतं थोडंफार, खूप काही बोलायचं असतं, सांगायचं असतं, पण ब्रम्हदेवाने एक म्यान्युफ्याक्चरिंग डिफ़ेक्ट ठेवला कदाचित आणि बोलकेपणाचा कॉम्पोनंट टाकायला विसरला बापडा, असंच मग सगळं साठत जातं, आणि एकदिवस ढगफुटी होते आणि सगळं अस्ताव्यस्त कागदावर पसरतं.

पाऊस कितीही जोरात आणि भरभरून असला ना, तरी ना ओंजळीत पकडता येतो ना तो कधी अळवाच्या पानावर थांबतो, अगदी क्षणिक सुखासारखा, कितीही पकडायचा प्रयत्न केला तरी शेवटी तेच कोरडे पान आणि तीच रीती ओंजळ. ह्या क्षणिक सुखाच्या आठवणी मात्र एकदम उलट असतात, रेंगाळतच राहतात. ह्या तथाकथित सुखद आठवणीच डोळ्यांत पाणी का आणतात कोण जाणे , ओंजळ सोडून गेलेलं पाणी डोळ्यांतून बाहेर पडत असावं बहुतेक.

लहानपणापासून जसं मला आठवतं तसं आमचं राहतं घर पावसात खूप गळायचं, जागोजागी वाट्या, पातेली ठेवलेली असायची घर जास्त ओलं होवू नये म्हणून, तरीही भिंतींमधून ओल न चुकता हजेरी लावायचीच. ह्याचा सगळ्यांत जास्त त्रास आईला आणि आजीला व्हायचा. आजीचा दमा वाढायचा, आणि आईचं काम. मग आम्हीही कामाला लागायचो. तरीसुद्धा ना मला कधी त्या घराचा तिटकारा वाटला ना पावसाचा. वडील गेल्यानंतर जेव्हा ते घर विकायला  काढलं, तेव्हा सौदा करताना शेवटी पाऊसच डोळ्यांत धावून आला.

असो, बाहेरचा पाऊस, अगदी चेरापुंजीतला सुध्दा दोन महिने तरी विश्रांती घेतो. पण आतल्या पावसाचं काय करायचं, तो तर सतत कोसळतच असतो, अगदी अविश्रांत….