सध्या फेसबुक हे झपाट्याने खालील गोष्टींच्या जाहिरातींचे सुलभ आणि स्वस्त माध्यम बनू पाहत आहे
-तुमची पाहिलीवहीली प्रदेश वारी
-लंडन आय, सिअर्स टावर, टाईम्स स्क्वेअर अशा तत्सम प्रागैतिहासिक वास्तू ओढून ताणून फ्रेम मध्ये घेवून तुमच्याच नव्या कोऱ्या डिजिटल कॅमेर्याने (ह्याचा उल्लेख मात्र हवाच हं)काढलेला तुमचा राजबिंडा फोटो
-तुमचा Montessori मधील खत्रूड शिक्षकाबरोबरचा ग्रुप फोटो, आणि आपण तेव्हासुद्धा आजच्या इतकेच बावळट दिसतो हे बघून मिळालेले डझनभर लाईक्स
-तुमची रायगड, सिंहगड, लोहगड, जमल्यास पर्वती, टेम्बलाई, वेताळ बाबा टेकडी चढाई
-तुमच्या ऑन साईट वाल्या rented किचन मध्ये भगीरथ प्रयत्नाने बनविलेली वांगे पोहे, कांदे खिचडी पासून अगदी नेपाळी गाडीवाल्याच्या तोंडात मारेल अशी चायनीज पाव भाजी
-तुमच्या लग्नात कसाबसा कोल्हापूरी फेटा चढवून ,कडक इस्त्री करून घातलेला आणि नंतर कधीही उन्ह न पाहणारा ब्लेझर अथवा तुमची कांजीवरम, बनारसी, इंदोरी, चंदेरी, खांदेरी साडी/शालू (चूक भूल देणे घेणे)
-तुमचे मौजे काश्मीर, शिमला बुद्रुक, गेला बाजार स्वित्झर्लंड खुर्द मध्ये साजरे केलेले हनिमून आणि तेथे गाढव सदृश प्राण्यावर स्वार होवून काढून घेतलेले फोटो
-तुमच्या पाल्याने लंगडी पळती, शिवा शिवी,दोरीच्या उद्या इ. मध्ये मिळविलेले उत्तेजनार्थ बक्षिस
-तुम्ही रणरणत्या उन्हात, अशक्य उकाड्यात , किमान एक लाखांच्या गर्दीत बसून पाहिलेली आयपीएल ची लुटुपुटूची म्याच
-र ला र आणि ठ ला ठ जुळवून केलेली एखादी प्रबोधक ,शृंगारिक किंवा विरह चारोळी
-झालंच तर, तुमची अलिबाग, दिवेआगर वगैरे ट्रीप, तुमचा (पाळीव) कुत्रा/कुत्री, मांजर/बोका, सरडा/सरडी, ग्राम्पंचायात एरियात नुकताच पझेशन मिळालेला लक्झुरीयस फ्लयाट, सोसायटीचा गणेशोत्सव, कुठल्याश्या सुमार नाट्य अभिनेत्याबरोबरचा फोटो, घरात नव्याने बसविलेला कमोड वाला संडास इ. इ. इ.
बास्स,आज इतकेच,जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही नम्र विनंती
No comments:
Post a Comment