Monday, June 23, 2008

मी केलेल्या काही निवडक चारोळ्या

कधी कधी बान्ध भावनान्चे
अचानक फुटतात
पण अश्रू मात्र
पापण्यान्तच गोठतात...

अचानक येणारा पाऊस
आणि नकळत येणार्या आठवणी
सरता सरत नाहीत
दोघेही चिम्ब भिजवून जातात
शरीराला अन मनालासुद्धा...

प्रेम व्यक्त करायला
का असतात, शब्दान्ची बन्धने ??
पुरेशी नसतातच का कधी
तुझ्या-माझ्या ह्रदयाची स्पन्दने ??

मीही आता शिकलोय
मनातले मनातच ठेवायला
आणि उगाचच ओठावर
खोटे हसू खेळवायला

पावसाने थोडे तिच्या
येण्यासाठी थाम्बावे...
पण ती आल्यावर मात्र
मनसोक्त बरसावे...

आयुष्यावर हसता हसता
हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले
आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब
नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले

कवितांवर कधीच
भुलायचं नसतं
कारण कवितान्च्या जगात
सगळंच कही खरं नसतं

व्याकरणाचे नियम मी
सहसा पाळत नाही...
कारण प्रत्येक गोष्ट साच्यात बसविणं
मला कधीच जमत नाही....

पाउस रुसलेला..
थोडा डोळ्यांत सांडलेला..
तुझ्या आठवणींचा कप्पा
हृदयात दाटलेला....


थोडा पाऊस नभात
थोडा पाऊस मनात
एक एका गं सरीत
तुझी चाहूल ऊरीत..


पाऊस असा हळूच
ऊन्हात भिजून येतो 
सळसळणारी स्पंदने
अलगद गोठवून जातो..

पाऊस कधीचा ..
कोसळतो अंतरात
काहूर अनामिक एक 
दाटते स्पंदनात...

क्षण कातर..
क्षण विरलेले ..
क्षण आठवणींच्या शिडकाव्यात .
चिंब भिजलेले ..

तिन्हीसांजेला तेवत
माझ्या मनात गं वात 
कातरवेळी का आठवत 
तुझी दोन क्षणांचीच साथ?

आज बाहेर नटला 
धुंद पावसाचा दिस
श्वासाश्वासांत दाटला 
मंद मातीचा गं वास…

अडगळीतल्या आठवणींचा पसारा 
मी आवरत होतो 
आणि हसता हसता चोरून 
डोळयांच्या कडा पुसत होतो.

असंच एखाद्या संध्याकाळी , अंत:करण जड होतं,
पावलं आणखीनच जडावतात,
आणि रीत्या ओंजळीकडे पाहता पाहता,
डोळे आपसूकच पाणावतात….  

2 comments:

Charushila Sanap said...

who is tht lucky girl?

chilmibaba said...

u mean to say girl(s)? :)